
देसाईगंज : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर देसाईगंज येथील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश फाफट यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने देसाईगंज नगर परिषदेत भाजपला ताकद मिळाली आहे. हा पक्षप्रवेश गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी तथा चिमुरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत पार पडला.

भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश फाफट, राज आकरे, अमित जेजानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल साधवानी, खुशबू अनिल साधवानी तसेच सुधीर साधवानी, आशिष रामानी, ठाकूर परसवानी, विजय मोटवानी, रिजवान खानानी, प्रदीप निरंकारी, रवी डेंगानी, प्रदीप साधवानी, शंकर परसवानी, मुरली मोटवानी, कृपालदास देवानी, हर्ष कुकरेजा, जितू अंदानी, सुधीर रामानी, पंकज केशवाणी, अविनाश मिरगानी, सुरज कुकरेजा, आशिष साधवानी, गौरव परसवानी, विशाल डेंगानी, जॅकी मोटवानी, महेश गगनानी, रितिक मोगरे, सहेज साधवानी, जानू डेंगानी, समीर लालानी, प्रणय नागदेवे, आशिष कुकरेजा, प्रशांत मेश्राम, राहुल सतवाणी, आशिष नागदेवे, विवेक डेंगानी, आर्यन मेश्राम, भाविक कुकरेजा, गोविंद साधवानी, नितीन मलंग, कोमल साधवानी, अनुष्का रामानी, रश्मी केशवाणी, दीक्षा सतवाणी, कोमल परसवानी यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यथोचित सन्मान राखला जाईल- भांगडिया
यावेळी बोलताना आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया म्हणाले, आमचे सरकार हे नागरिकांचा विश्वास, अपेक्षा आणि समर्थन यावर चालणारे आहे. शहरातील आणि ग्रामीण भागाचा विकास करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठीच भाजप लोकाभिमुख कामे करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल आणि त्यांना योग्य संधी दिली जाईल.
माजी आमदार कृष्णा गजबे हे प्रतिक्रिया देताना म्हणाले, भाजपवर विश्वास व्यक्त करत काँग्रेस-राष्ट्रवादी सोडणाऱ्या या पदाधिकाऱ्यांमुळे आगामी नगर परिषद निवडणुकीला एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रवेशाने पक्षाला अधिक बळ मिळाले असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सदैव तत्पर राहील.
यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, मोतीलाल कुकरेजा, गौरव ब्रम्हपुरी, राजू जेठानी, सचिन खरकाटे, आकाश अग्रवाल, नरेश विठ्ठलानी, सचिन वानखेडे यांच्यासह वडसा येथील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































