गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या प्रणोती सागर निंबोरकर यांनी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. माजी खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) आणि स्टार प्रचारक असलेले डॉ.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नेते यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सागर निंबोरकर, डॉ.भारत खटी व संजय बारापात्रे उपस्थित होते. निंबोरकर यांच्या उमेदवारीमुळे नागरिकांमध्ये नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.
































