गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे गडचिरोली शहरातून मोठी रॅली काढून गोकुळनगरात प्रचारसभा घेण्यात आली. या सभेला शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी आणि नागरिकांनी हजेरी लावली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत विकासाचा अजेंडा मांडत राकाँ (एसपी)च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू साळवे, पक्षाचे राज्य सरचिटणीस अॅड.संजय ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष शेमदेव चापले, राजू भुसारे, सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर भेंडारे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हुसैन शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, शहर अध्यक्ष एजाज शेख, वैभव शिवनकर, सादीकखाँ पठाण तसेच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार बिपाशा राजू भुसारे, नगरसेवकपदासाठी असलेले उमेदवार प्रभाग क्र.12) मधील आशा मुकेश मेश्राम व चंद्रशेखर नरेंद्र नैताम, तसेच प्रभाग क्र.13) मधील तुळशीराम रुषी सहारे, पुजा पंकज जवादे आणि नीता सुरेश बोबाटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमच्या उमेदवारांना कौल दिल्यास गडचिरोली नगर परिषदेचा चेहरामोहरा बदलवून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दिले. प्रास्ताविक चंद्रशेखर नैताम यांनी तर संचालन एजाज शेख यांनी केले आहे.
































