आ.वडेट्टीवार, मसराम यांचा आज सत्कार, निवडणुकीतील विजयानंतर आगमन

विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

गडचिरोली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार आणि आरमोरी क्षेत्राचे नवनिर्वाचित आ.रामदास मसराम यांचा आज (दि.12) गडचिरोलीत नागरी सत्कार घेतला जाणार आहे. काँग्रेस पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी मतदार संघातील सलग विजयानंतर आ.वडेट्टीवार गडचिरोलीत येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा सत्कार ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी फळ वाटप आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन केले असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.