गडचिरोली : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून राजनगरी अहेरीतील इंदिरानगर प्रभागासह इतर प्रभागातील महिलांनी बुधवारी रुक्मिणी महालात येऊन अहेरी इस्टेटीचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना राख्या बांधल्या. विधानसभा निवडणुकीत आपला विजय होवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
याप्रसंगी अम्ब्रिशराव यांनी महिलांची चौकशी करत विविध समस्यांवर चर्चा केली. हा भाऊ सुख-दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुमचा प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.