गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये यावेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अपेक्षाभंग झालेल्या ईच्छुकांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक बंडखोरी काँग्रेस पक्षात झाल्याचे दिसून येते. काल नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आज त्या अर्जांची छाननी होईल. वैध ठरलेल्या नामांकनधारकांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे असंतुष्टांचे बंड थंड करून किती जण माघार घेतात आणि कोण-कोण रिंगणात राहतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. तीनही मतदार संघात नामांकन दाखल करणाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
आरमोरी (अ.ज.)- या विधानसभा मतदारसंघात गजबे कृष्णा दामाजी (भारतीय जनता पार्टी), रामदास मळूजी मसराम (इंडीयन नॅशनल काँग्रेस), आनंदराव गंगाराम गेडाम (अपक्ष), वामन वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), शिलु प्रविण गंटावार (अपक्ष), माधुरी मुरारी मडावी (अपक्ष), खेमराज वातुजी नेवारे (अपक्ष), मोहनदास गणपत पुराम (वंचित बहुजन आघाडी), निलेश देवाजी हलामी (अपक्ष), चेतन नेवशा काटेंगे (आझाद समाज पार्टी-काशीराम), अनिल तुलाराम केरामी (बहुजन समाज पार्टी), दामोधर तुकाराम पेंदाम (बहुजन समाज पार्टी), निलेश छगनलाल कोडापे (अपक्ष), प्रा.रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांचा समोवश आहे.
गडचिरोली (अ.ज.)- या विधानसभा मतदारसंघात मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ.मिलिंद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), डॉ.देवराव मादगुजी होळी (अपक्ष), आसाराम गोसाई रायसिडाम (अपक्ष), विश्वजीत मारोतराव कोवासे (इंडियन नॅशनल काँगेस), जयश्री विजय वेळदा (भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष), योगेश बाजीराव कुमरे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), भरत मंगरूजी येरमे (वंचित बहुजन आघाडी), डॉ.सोनल चेतन कोवे (अपक्ष), बाळकृष्ण वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), मोरेश्वर रामचंद्र किनाके (अपक्ष), वर्षा अशोक आत्राम (अपक्ष), दिवाकर गुलाब पेंदाम (अपक्ष), संजय सुभाष कुमरे (बहुजन समाज पार्टी).
अहेरी (अ.ज.)- विधानसभा मतदारसंघात आत्राम धर्मराव भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट), राजे अम्ब्रिशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), दीपक मल्लाजी आत्राम (अपक्ष), नितीन कविश्वर पदा (अपक्ष), भाग्यश्री मनोहर लेखामी (अपक्ष), निता पेंटाजी तलांडी (अपक्ष), आत्राम तनुश्री धर्मरावबाबा (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी), संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रमेश वेल्ला गावडे (बहुजन समाज पक्ष), अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), पोरतेट ऋषी बोंदय्या (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गट), कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू (अपक्ष) यांचा समावेश आहे.