गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजचे पं.स.सभापतीपद ‘नामाप्र’साठी

मुलचेरा एससी, उर्वरित एसटी राखीव

गडचिरोली : जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण सोडत काढून निश्चित करण्यात आले. त्यात आदिवासीबहुल क्षेत्राबाहेरील 5 पैकी गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या 3 पंचायत समित्यांचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव निघाले. मुलचेरा एसटी (महिला) तर चामोर्शीत अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातील उमेदवार सभापतीपदी विराजमान होणार आहे. उर्वरित सर्व सभापतीपद एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत.

या आरक्षण सोडतीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांना प्राधिकृत केले होते. जाधव यांनी शुक्रवारी (दि.10) दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन सभागृहात आरक्षण सोडतीसाठी सभा घेतली. यावेळी अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या 7 पंचायत समित्यांचे आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील 5 पंचायत समित्यांचे सभापतीपद खालीलप्रमाणे चक्रानुक्रमानुसार आरक्षित करण्यात आले.

असे आहे पं.स.निहाय आरक्षण

कोरची – अनुसूचित जमाती (महिला), कुरखेडा – अनुसूचित जमाती, धानोरा- अनुसूचित जमाती, एटापल्ली – अनुसूचित जमाती (महिला), भामरागड- अनुसूचित जमाती, अहेरी- अनुसूचित जमाती (महिला), सिरोंचा- अनुसूचित जमाती (महिला), तसेच गडचिरोली – ना.मा.प्र. (महिला), चामोर्शी अनुसूचित जमाती (महिला), मुलचेरा- अनुसूचित जाती (महिला), देसाईगंज- ना.मा.प्र., आरमोरी- ना.मा.प्र.