गडचिरोली : सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी 9 जुलैला (बुधवारी) दुपारी 1 वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सभेचे आयोजन केले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार दिनांक 13 जून 2025 ते 12 जून 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंचपदासाठी या सभेत आरक्षण निश्चित केले जाणार आहेत. यात गडचिरोली तालुक्यातील एकूण 51 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे आरक्षण ठरविले जाणार आहे. त्यापैकी बिगर अनुसूचित क्षेत्रातील 34 आणि अनुसूचित क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतींसाठी महिलांसाठी राखीव सरपंचपदही निश्चित केले जातील.
सदर आरक्षण सोडत सभा पारदर्शकतेने व नियमानुसार पार पाडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गडचिरोली यांनी केले आहे.