देसाईगंज : पूर्व विदर्भात शिवसेनेला (उ.बा.ठा.) महाविकास आघाडीत विधानसभेची एकच जागा मिळाल्याने येथील सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांध्ये असंतोष वाढला आहे. सेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत जोशी यांनी पक्षात वाव मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ सहकार नेते

तथा गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा.पोरेड्डीवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार कृष्णा गजबे यांच्या महारॅलीप्रसंगी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी सहकार महर्षी अरविंद सा.पोरड्डीवार, भाजपचे
विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, आमदार कृष्णा गजबे, विधानसभा महायुती समन्वय प्रमुख किसन नागदेवे, पिरिपा कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेनेच्या (शिंदे) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना गोंदोळे, भाजप अनु.जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड.उमेश वालदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तलमले, युनूस शेख, संजय साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण धकाते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

































