भामरागड तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल

ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले स्वागत

अहेरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहेरी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भामरागड तालुक्यातील शिवसेनेचे (उबाठा) सर्व पदाधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

रियाज शेख यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश करताच त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी आपल्या जुन्या सहकाऱ्यांनाही राष्ट्रवादीत घेतले. ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजवाड्यात त्यांचा जाहीर प्रवेश झाला. धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या घडामोडींमुळे भामरागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळकटी मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे भामरागड तालुकाध्यक्ष खुशाल मडावी, नगरसेवक गजानन उईके , शहर प्रमुख व्यंकटी ईष्टाम, महिला आघाडी तालुका प्रमुख निर्मला सडमेक, जनाबाई सडमेक, उर्मिला मडावी, संपत मडावी, मोतीराम मडावी, सुमित्रा वेलादी, तारा मडावी, वच्छला टेकाम, अक्षत मंडल, अनिल कुळमेथे, शाहनवाज पठाण, दशरथ सडमेक, दुगा विडपी, स्वप्नील गावडे, रवींद्र उईके, हरीश मडावी, धर्मेंद्र उईके, अरुण मडावी, ईश्वर मडावी, उमेश वेलादी, सुरेश जुंबडे, अंबादास मडावी, लव कन्नाके, जयराम पोरतेट, बाळू उईके यांच्यासह इतर शिवसैनिकांचा समावेश आहे.