मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

अन्नदानासह शालेय साहित्याचे वाटप

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांचा वाढदिवस आज (दि.1 जुलै) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

सकाळी 8 वाजता चामोर्शी रोड येथील जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील. त्यानंतर सकाळी 8.30 वाजत सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा व “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करतील. त्यानंतर महिला रुग्णालयात माणुसकीचा एक ध्यास अंतर्गत अन्नदान, फळवाटप, चामोर्शी मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्याचे किट वाटप व मूकबधीर विद्यालय मुरखडा तथा मतीमंद विद्यालयात शालेय नोटबुक-पेनचे वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सायंकाळी 7 वाजता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.