राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी तनुश्री आत्राम यांची वर्णी

युवतींना पक्षाशी जोडण्याचे आव्हान

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्हा युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षवाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास तनुश्री यांनी व्यक्त केला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार व प्रांताध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने तनुश्री आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसेच्या प्रदेशाध्यक्ष संध्या उद्धव सोनवणे यांनी तनुश्री आत्राम यांना पाठवले. त्यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि युवती कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जात आहे.