गडचिरोली : ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला व अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि.21) सायंकाळी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते कारगिल चौक या मार्गावर तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. मंगळवारी भाजपच्या पुढाकाराने काढलेल्या रॅलीनंतर सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसने काढलेल्या या रॅलीची शहरवासियांमध्ये चर्चा होती.
ही तिरंगा रॅली म्हणजे शूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारी आणि जनमानसात एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी ठरेल, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. या रॅलीत खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदास मसराम, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, परसराम टिकले, पांडुरंग घोटेकर, नितेश राठोड, हरबाजी मोरे, देवाजी सोनटक्के, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, वसंत राऊत, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, वामनराव सावसाकडे, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, निशांत वनमाळी, कुसुम आलाम, विनोद लेनगुरे, दिलीप घोडाम, कारगिल स्मारक समितीचे अध्यक्ष उदय धकाते यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.