गडचिरोली : भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम गडचिरोलीत झाला. भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम श्रद्धापूर्वक वातावरणात झाला.
प्रारंभी डॉ.अशोक नेते यांनी डॉ.मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी डॅा.मुखर्जी यांच्या राष्ट्रहितासाठी दिलेला त्याग, दूरदृष्टी आणि “एक देश – एक विधान” या ध्येयासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत अभिवादन व्यक्त केले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतमातेची सेवा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

या कार्यक्रमाला प्रामुख्याने ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी नगराध्यक्ष भूपेंद्र कुळमेथे, नंदु काबरा, रमेश नैताम, महादेव पिंपळशेंडे, प्रशांत अल्लमपटलार, राकेश राचमलवार, फुलचंद वाघाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.