चामोर्शी : भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा तालुका चामोर्शीच्या वतीने आज, दि.19 सप्टेंबर रोजी चामोर्शीमधील बालाजी सभागृहात देवेंद्रजी ऊर्फ देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा, अर्थात नारीशक्तीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन अनुसूचित जाती-जनजाती संसदीय समितीचे अध्यक्ष, तथा चंद्रपूर-गडचिरोलीचे प्रवासी प्रभारी खा.फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा चंद्रपूर-गडचिरोली लोकसभेचे संयोजक माजी खा.अशोक नेते राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री आ.डॅा.परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे राहणार आहेत.
या मेळाव्यात माजी खा.अशोक नेते यांच्याकडून सर्व महिला भगिनींना गिफ्टसुद्धा दिले जाणार आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, तालुका चामोर्शी यांच्यावतीने करण्यात आले आहे.