चामोर्शी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीचे वेध लागत आहेत. भाजपने एका-एका परिसरात आपले जाळे मजबूत करण्यासाठी युवा वर्गाला आपलेसे करण्याची रणनिती सुरू केली आहे. त्यातूनच चामोर्षी तालुक्यातील आष्टी-इल्लूर भागातील अनेक युवांनी माजी खासदार डॅा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. (अधिक बातमी खाली वाचा)

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या नेतृत्वात अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात पक्ष प्रवेश केला. (अधिक बातमी खाली वाचा)

माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसच्या माजी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदीलवार यांचे पती संजय पंदीलवार यांनीही भाजपचा दुपट्टा टाकून भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यांच्यासह (अधिक बातमी खाली वाचा)

शशांक वैद्य, डॉ.सादमवार, गौरव वाट, आयुष पंदीलवार, समीर कारकुटवार, दिलीप प्यारमवार, प्रवीण सुर्तीकार, समीर आचेवार, विश्वनाथ कारकुटवार, मधुकर पुज्जलवार, प्रभाकर तिरपतवार, गणेश बत्तीवार, गंगाधर आलाम, प्रभाकर बावणे, रमेश चुनारकर, आनंद मेश्राम, प्रफुल पंदीलवार, दीपक पंदीलवार, आनंद वर्धेलवार आदींनीही भाजपचा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश केला. (अधिक बातमी खाली वाचा)

या पक्षप्रवेशामुळे चामोर्शी तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर गडचिरोली शहरातील कंत्राटदार राजू भुसारी यांनीही भाजपात प्रवेश करून पक्षशक्तीला बळ दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते होते. यावेळी सावलीचे भाजपा नेते देविदास बानबले, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे व पवन रामगिरकर आदींचीही उपस्थिती होती. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी बोलताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, हे राष्ट्रनिर्मितीचे आंदोलन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारा आणि विकासाचा नवा आदर्श घडविणारा हा पक्ष आहे. आज आष्टी–इलूर परिसरातील या पक्षप्रवेशामुळे भाजपा परिवार अधिक सक्षम आणि जनतेच्या मनाशी घट्ट जोडला गेला आहे.











