ना.जयस्वाल यांच्या उपस्थितीत युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु

गडचिरोली : शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना विविध पक्षातील युवकांनी गडचिरोली येथील विश्रामगृहात त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यात धानोरा व इतर तालुक्यातील युवकांचा समावेश होता.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. जयस्वाल हे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री असल्याने निवडणुकीत पक्षाला या जिल्ह्यात यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचे काम शिवसेना करत असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी ना.जयस्वाल यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, युवा सेना प्रमुख दीपक भारसाकडे, युवासेना शहर प्रमुख कल्पक मुप्पीडवार आदीसह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये भूषण यमावार, संकेत नमनुरवार, अंकित बुद्धलवार, माहीम पठाण, नयन खोब्रागडे, सागर कुमरे, राहूल कुमरे, संकेत मेश्राम, मनोज सुरपाम, साहिल कुमरवाऱ, अंकुश मुत्तेमवार, गौरव खोब्रागडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.