अहेरी : इंदाराम येथील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करत पक्षात सक्रियपणे काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत माजी मंत्री, तसेच विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा टाकून पक्ष प्रवेश करून घेतला.

याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, रामेश्वरबाबा आत्राम, तसेच उपसभापती किशोर करमे उपस्थित होते.

पक्ष प्रवेश करणाऱ्या प्रमुख युवांमध्ये उमेश कोरेत, रमेश आत्राम, संपत कोरेत, गणपत तावडे, पुनेश नैताम, गोवर्धन विट्टीवार, राकेश सडमेक, रवींद्र तलांडे, अशोक कोरेत, निलेश पोरतेट, लक्ष्मण नैताम, संजय चौधरी, राकेश कलाके, संजय कोरेत, पोचला कांबळे, विनोद कांबळे, मनोहर तावाडे आदींचा समावेश आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांची स्वागत करत त्यांना पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याचे आवाहन केले. युवकांचा सहभाग स्थानिक राजकारणाला नव्या उमेदीसह सामर्थ्य प्रदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












