उमेदअंतर्गत प्रयास महिला प्रभाग संघाचे देसाईगंजमध्ये वार्षिक अधिवेशन

एक हजारावर महिलांची उपस्थिती

देसाईगंज : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती कार्यालय देसाईगंज अंतर्गत प्रयास महिला प्रभाग संघ शिवराजपूर यांचे वार्षिक (सन 2023-24) अधिवेशन 31 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात झाले. देसाईगंज येथील नगरपरिषद सांस्कृतिक भवनात आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ.गजबे यांच्यासह इतर मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, माई रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. या अधिवेशनाला उमेद प्रभागातील ग्राम संघांनी, बचत गटातील महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रभाग समुहातील एक हजारावर महिलांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री योगेश नाकतोडे, वसंतराव दोनाडकर, महिला व बालकल्याणच्या माजी सभापती रोशनी पारधी, माजी उपसभापती गोपाल उईके, अर्चना ढोरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शंकर पारधी, प्रमोद झिल्पे, शिवराजपूरच्या सरपंच सुषमा सयाम, तुळशीचे सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच केवळराम टिकले, महिला प्रभागागाच्या अध्यक्ष माला मेश्राम, जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल भोपये, तालुका अभियान व्यवस्थापक व्ही.एम.बरडे प्रामुख्याने उपस्थित होते.