महिलांच्या अभूतपूर्व रॅली आणि ढोलताशाने दणाणले गडचिरोली

अश्वारूढ राणी लक्ष्मीबाई आकर्षण

गडचिरोली : हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत निघालेली महिलांची रॅली अभूतपूर्व ठरली. मराठमोळ्या वेशभुषेत सहभागी झालेल्या महिला आणि महिलांचेच ढोलपथक हे यावर्षीचे वैशिष्ट्य होते. याचबरोबर अश्वावर आरूढ राणी लक्ष्मीबाईच्या वेशभुषेतील भगिनी आणि बुलेटवर स्वार युवतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

ही रॅली म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणाची झलक आणि पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्यांसाठी एक चपराक होती. नववर्षाचे स्वागत 31 डिसेंबरच्या रात्रीप्रमाणे झिंगून न करता या पद्धतीने करावे, हा संस्कार पुढच्या पिढीला देण्याचा आमचा प्रयत्न होता, असे रॅलीच्या आयोजक असलेल्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांनी सांगितले. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

साई मंदिराजवळ या रॅलीला आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे प्रामुख्याने उपस्थित होते. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

शहराच्या प्रमुख मार्गाने पायी फिरलेल्या या रॅलीत रथावर आरूढ श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या वेशभुषेतील बालकांनीही लक्ष वेधले. भगवा ध्वज हाती घेत महिला अतिशय उत्साहाने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. (अधिक वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा)

नऊवारी साडी, फेटा, नथ अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांच्या या रॅलीचे गडचिरोलीकरांनी ठिकठिकाणी स्वागत केले. यापूर्वी दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांची बाईक रॅली निघत होती. पण यावर्षी पहिल्यांदाच पायी रॅली काढण्यात आली.