गडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरच्या लक्ष्मीनगर वॅार्डातील महिलांनी 29 सप्टेंबर रोजी बतकम्मा देवीचा उत्सव साजरा केला. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दाक्षिणात्य पद्धतीने पुजाअर्चा करत दांडिया नृत्य सादर केले.
यावेळी वैशाली पडिशालवार, निरजा देसुवार यांच्या पुढाकाराने रंगीबेरंगी फुलांची सजावट करून बतकम्मा देवीची मूर्ती साकारण्यात आली. त्यानंतर उपस्थित महिलांनी बतकम्मा देवीचे पूजन केले. महिलांनी दक्षिण भारतीय शैली वेशभूषेत दांडिया खेळून नाच, गाणी सादर करत या उत्सवाचा आनंद घेतला व बतकम्मा देवीचा जयघोष केला. यावेळी परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
या उत्सवात ममता रणदिवे, वैशाली रणदिवे, स्नेहा शेंडे, साची मसराम, साधना बुर्लावार, प्रभा खोब्रागडे, उज्वला झिलपे, शोभा चिचघरे, वृषाली पोरेड्डीवार, वैशाली जेट्टीवार, भावना सूत्रपवार, अर्चना माणूसमारे, कीर्ती गोबाडे, प्रणाली रणदिवे, प्रतिभा वरगंटीवार, प्रेमा कोकणे, सोनी शिनगारे, पल्लवी हरडे, प्रशांती पुल्लुरवार, अर्चना गुमलवार, शालिनी तर्वेकर, साधना हरगुडे आदींसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.