दक्षिण गडचिरोलीत उत्साहाने बतकम्मा उत्सवाची सांगता

फुलांची आरास करत धरला फेर

कमलापूर : दाक्षिणात्य संस्कृतीचा भाग असलेला बतकम्मा उत्सव जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांत उत्साहाने साजरा करण्यात आला. सोमवारी या नऊ दिवसीय उत्सवाची सांगता झाली. यानिमित्त फुलांची आरास करत सजवल्या जाणाऱ्या बतकम्मा भोवती महिलांसह पुरूषांनीही फेर धरून लयबद्ध नृत्य करत देवीची आराधना केली.

कमलापूरपासून 2 किमी अंतरावर असलेल्या मोद्दुमडगू या गावात नऊ दिवसांपासून हा उत्सव सुरू होता. सोमवारी (दि.29) या उत्सवाची सांगता झाली. यावेळी तेलगू भक्तीगितांवर बतकम्माभोवती फेर धरून महिलांनी गरबाप्रमाणे नृत्य सादर केले. फुलांची आरास करण्यासाठी फुले गोळा करताना महिलांना पुरुष मंडळींनीही मदत केली.