गडचिरोली : ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळणार आहे. हे विधेयक म्हणजे खरोखरच महिलांचा खरा सन्मान आहे, असे प्रतिपादन भाजपच्या नारीशक्ती वंदन गडचिरोली जिल्हा प्रभारी आरती वानखेडे यांनी केले.
आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित भाजप महिला आघाडीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विशेष निमंत्रित सदस्य तथा अमरावती ग्रामीणच्या माजी जिल्हाध्यक्ष छाया दंडारे, गडचिरोली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व नगरसेविका योगिता पिपरे, विद्यमान नगराध्यक्ष प्रणोती निंबोळकर, भाजपा राज्य परिषदेच्या सदस्य डॉ.चंदा कोडवते, माजी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या बैठकीचा मुख्य उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत या विधेयकाला समर्थन देण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने 11 ते 18 एप्रिल यादरम्यान विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीला ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, महामंत्री लता पुंगाटे, तालुका अध्यक्ष किरण चचाने, चामोर्शीच्या तालुका अध्यक्ष कविता किरणे, गडचिरोली शहर अध्यक्ष सीमा कन्नमवार, जिल्हा महामंत्री अर्चना बोरकुटे, तसेच माधवी पेशेट्टीवार, शिल्पा राय, रंजना कोडाप, पल्लवी बारापात्रे, अर्चना ढोरे, नगरसेविका शिल्पा हेमके, गुड्डी मारभते, कोमल नैताम, साक्षी बोलूवार, अर्चना निंबोड, माजी नगरसेविका लता लाटकर, अलका पोहनकर, वैष्णवी नैताम आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बैठकीचे आयोजन योगिता पिपरे यांनी, रसंचालन अर्चना बोरकुटे यांनी, तर आभार सीमा कन्नमवार यांनी मानले.
































