अहेरीत उद्योगासाठी महिलांना चालना, संसारोपयोगी साहित्य स्वस्तात देणार

गाव माझा फाउंडेशनचा शुभारंभ

अहेरी : येथील हसन बाग हॉटेलजवळ ‘गाव माझा उद्योग फाउंडेशन’च्या प्रकल्पाचा शुभारंभ सोमवारी (दि.31 मार्च) अहेरीच्या नगरसेविका तथा सभापती नौरास शेख यांच्या वतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर राजकपूर भडके, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कांता भडके, आम्रपाली कोसंकर, संजना नेवारे, दीपमाला झाडे उपस्थित होते.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी गाव माझा उद्योग फाउंडेशन सदैव तत्पर असून शासनाचे ‘लखपती दीदी’ या अभिनव उपक्रमातून महिलांना लखपती करण्याचे लक्ष्य असल्याचे राजकपूर भडके यावेळी म्हणाले.

या प्रकल्पात संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य स्वस्त व माफक दरात मिळणार असल्याचे राजकपूर भडके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांता भडके यांनी, तर संचालन प्रांजली मेकर्तीवार, रुपाली जाकेवार यांनी केले.