कलार समाज संघटनेतर्फे स्नेहमिलन व हळदीकुंकू कार्यक्रम

गडचिरोली : कलार समाज संघटना गडचिरोलीतर्फे 25 जानेवारीला अभिनव लॉन गडचिरोली येथे स्नेहमिलन व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, तर प्रमुख अतिथी म्हणून आ.डॅा.मिलींद नरोटे, सचिन उके, निरंजन पाटील वासेकर, हेमंत जंबेवार, रविंद्र वासेकर, दिनेश पा.चिटनुरवार, सुनील चडगुलवार, श्रीनिवास दुल्लमवार, दामोदर मांडवे, संजय गैनवार, शालीक बहीरवार, मंजुताई वासेकर, संगीता अतकमवार, वैशाली मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ना.अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते सरदार वीर पापन्ना गौड, रेणुकामाता, श्रीगणेशाच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. समाजातील सर्व प्रवर्गातील बंधु भगिनिंनी हा सोहळा घडवून आणला. त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करुन आपला समाज हा परिवर्तनशिल असला पाहीजे. त्यासाठी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक उन्नती करण्याचा प्रयत्न संघटीतपणे करावा. यासाठी मदत करण्याचा मी निश्चीतच प्रयत्न करेन असा विश्वास ना.अॅड. आशिष जयस्वाल यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना समाजबांधवांना दिला.

अध्यक्षपदावरुन मार्गदर्शन करताना प्रकाश पाटील मारकवार यांनी सर्ववर्गीय कलार समाज बांधवांनी यापुढे एकत्रित येणे काळाची गरज असून समाजातील गरीब कुटूंबांना आर्थिक मदत, शैक्षणिक सुविधा, आरोग्यविषयक मदत, विवाह मेळावे, परिचय मेळावे असे उपक्रम राबविण्यात यावे असे मत व्यक्त केलें.

स्नेहमिलन कार्यक्रमात काशिराम चडगुलवार, प्रशांत पा.चिटनुस्वार, किर्तनलाल मेश्राम, नामदेव बनसोड, मोरेश्वर वालोदे, मल्लेश वंगेवार, अनिल तिडके, विठ्ठल मुत्येमवार, मनोज मारगोनवार, प्रभाकर मंडावार, सदाशिव मंडावार, रविंद्र रंगुवार, राजेश महाजन, फकीरा गड्डमवार, शोभा मंडलवार, लिला मारकवार, माया वासेकर, निर्मला चडगुलवार, गिता वासेकर, विजयालक्ष्मी जंबेवार, उज्वला वालोदे, रेखा मेश्राम, ज्योती चिटनुस्वार, राधा गणवेनवार, वैशाली गणवेनवार, मनिषा शंकरवार, स्वाती वासेकर, वैशाली गड्डमवार, भावना बावनथळे, संगिता मुत्यलवार, रेणुका चिटनुवार, मयुरी पडालवार, सुनिता शंकरवार, अर्चना रामगोणीवार, नंदा सहदेवकर, सुनिता हजारे आदी अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाचे संचालन डॉ.राकेश चडगुलवार, तर आभार प्रदर्शन दिलीप मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शंकरवार, विजय मारकवार, दीपक चडगुलवार, चैतन्य चडगुलवार यांनी सहकार्य केले.