गडचिरोली : गडचिरोलीत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित झोनस्तरीय निरंकारी महिला संत समागम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले. येथील संस्कृती सांस्कृतिक भवनात झालेल्या या संत समागमात महिलांच्या भरगच्च उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शक सिया अधाने (संभाजीनगर) यांनी सद्गुरूच्या कृपेने प्राप्त ब्रह्मज्ञानाने जीवन कसे सहज आणि आनंदी होते यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
या संत समागमामध्ये गडचिरोलीसह गोंदिया, चंद्रपूर, वडसा, आरमोरी, ब्रम्हपुरी, मूल, चामोर्शी, आष्टी, धानोरा, एटापल्ल्ली, कुरखेडा, मालेवाडा, कोसंबी, नांदगाव, खाडीपार, नलेश्वर इ. परिसरातून महिला भाविकांनी भजन व प्रवचनाद्वारे आपला सहभाग घेऊन या समागमाचा लाभ घेतला.
या समागमासाठी निरंकारी सेवादलाच्या महिला व पुरूषांनी उत्तम व्यवस्था केली होती. समागमस्थळी कँटीन, पुस्तकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. तसेच सर्वासाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, गिता हिंगे, अनिता मडावी, गोविंद सारडा, सदानंद कुथे, रमेश भुरसे, अनिल कुनघाडकर, मधुकर भांडेकर आदींनी उपस्थिती लावली.
या समागमासाठी संत निरंकारी मंडळाच्या स्थानीय शाखेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल झोनल इंचार्ज किशन नागदेवे व गडचिरोली शाखेचे प्रमुख गजानन तुनकलवार यांनी सर्वांचे आभार मानले.