गडचिरोली : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनामार्फत सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची नागरी क्षेत्रात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता, तसेच मदत केंद्रांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी अधिकारी दौरा करणार आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदक्कर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भांदक्कर हे 19 जुलैपर्यंत जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील नगर परिषद / नगर पंचायतमध्ये भेट देऊन योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील. यावेळी ते संबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या या योजनेसंदर्भात समस्याही जाणून घेतील. ते 15 जुलै रोजी गडचिरोली, धानोरा व आरमोरी येथे भेट देतील. 16 जुलै रोजी देसाईगंज, कुरखेडा व कोरची, 18 जुलै रोजी चामोशी, मुलचेरा व एटापल्ली, 19 जुलै रोजी अहेरी, भामरागड व सिरोंचा येथे पाहणी करून आपला अहवाल 22 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. नागरिकांनी त्यांच्या समस्या भांदक्कर यांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांच्या संपर्क क्रमांक 9420045030 यावर नोंदवाव्या असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.