विसोरा, ठाणेगावात लाडक्या बहि‍णींसाठी मार्गदर्शन शिबिरे, आॅनलाईन नोंदणीही

आमदार कृष्णा गजबे यांचा पुढाकार

देसाईगंज : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचा दृष्टीने आ.कृष्णा गजबे यांच्या पुढाकाराने महिला बालकल्याण विभागामार्फत देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील ग्रामपंचायत सभागृहात, तसेच आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे शिबिरांचे आयोजन केले होते.

विसोरी येथील ग्रामपंचाय सभागृहात झालेल्या शिबिराचा शुभारंभ आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. अर्ज ऑनलाईन भरताना तो अचूक भरावा, असे मार्गदर्शन करत त्यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी सरपंच रमेश कुथे, उपरपंच संजय करंकर, महिला व बालकल्याण अधिकारी हेमके, संवर्ग विकास अधिकारी खोचरे, ग्रा.पं. सदस्य शिला परशुरामकर, नवलाक नेवारे, अंगणवाडी सेविका भावना नाकाडे, भावना टेंबुर्णे, वर्षा सोनवाने, विवेका धाकडे, सुनंदा फुले, सिंधू देवारे, मदतनीस भावना जांभूळकर, गायत्री नाकाडे, विशाखा मेश्राम, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, अधिकारी तथा गावातील महिला उपस्थित होत्या.

या शिबिरामध्ये लाभार्थ्यांचे फॅार्म / अर्ज भरणे व स्विकारणे, फॉर्म ऑनलाईन करणे यासाठी कॉम्प्युटर, प्रिंटर व इतर साहित्यांसोबत ऑपरेटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. गावातील महिलांनी मोठ्या संख्येने या योजनेसाठी अर्ज भरले.

ठाणेगाव ग्रामपंचायतमध्ये योजनेचे शिबिर

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे लाडकी बहिण योजनेअंतर्गत शिबिरामध्ये 170 महिलांनी आँनलाईन नोंदणी केली. सकाळी 9 वाजतापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत अर्जांची नोंदणी करण्यात आली. यात एकूण 344 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 170 अर्जांची आँनलाईन नोंदणी करण्यात आली. उर्वरित 174 अर्ज बाकी आहेत. येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शिबिरात नोंदणी करण्यासाठी ठाणेगाव, वासाळा, चामोर्शी व डोंगरगाव येथील संगणक चालक, ठाणेगाव येथील अंगणवाडी कर्मचारी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. महिलांना अर्ज ऑनलाइन करताना कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करून त्वरित त्या समस्येचे निराकरण करावे, अशी सूचना या शिबिराचे आ.कृष्णा गजबे यांनी केली.

यावेळी भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, आरमोरीचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, सांख्यिकी विस्तार अधिकारी मडावी, केंद्र प्रमुख श्रीमती शेडमाके, सरपंच वासुदेव मंडलवार, शिक्षण विस्तार अधिकारी कोकुडे, ग्राम विकास अधिकारी विजय गडपायले, ताराचंद कुनघाडकर, गंगाधर कुकडकर, महेश किरमे, जि.प.‌शाळेच्या मुख्याध्यापिका गिता बर्डे, शैलेंद्र गजभिये, विकास पायदलवार व महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.