गडचिरोली : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद संलग्नित गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा पार पडल्या. त्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच महिला व पुरुष खेळाडू मिळून 12 जणाची संभाजीनगर येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या स्पर्धेत 10 ते 55 वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. ट्रेडिशनल, फॅारवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग, हॅण्डबॅलन्स, लेग बॅलन्स, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर व सुपाइन अशा 10 प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले.
मा.खा.डॉ.अशोक नेते यांचा पुढाकार
माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी गडचिरोली येथील आपल्या निवासी कार्यालयात सर्व महिला खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य देऊन खेळाडूंचे मनोबल उंचावले. त्यांच्या या पुढाकारामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण 55 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या महिला व पुरुष खेळाडूंपैकी खालील 12 खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
वयोगट 28 ते 35 वर्षे : स्नेहा रत्नाकर वाणी (ट्रेडिशनल, लेग बॅलन्स), शीतल व्यंकटरमण येल्लेवार (ट्विस्टिंग), अश्विनी नत्थूजी ढेगळे (फॉरवर्ड बेंडिंग), वैशाली सोमेश धुडसे (सुपाईन), विशाल माधवराव भांडेकर (ट्रेडिशनल, लेग बॅलन्स).
वयोगट 35 ते 45 वर्षे : रमा अरविंद भैसारे (सुपाईन), चंदा दिलीप ठेरा (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), सुप्रिया रिलेश निखाडे (ट्वीस्टिंग), दीपिका विजय बोन्देलवार (लेग बॅलन्स).
वयोगट 45 ते 55 वर्षे : वसुधा विनोद बोबटे (ट्रेडीशनल, बॅकवर्ड बेंडिंग), वर्षा प्रवीण मोडक (लेग बॅलन्स), धनराज धोन्डूजी कांबळे (ट्रेडीशनल).
हे सर्व खेळाडू एन.आय.एस. योग प्रशिक्षक डॉ.अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. आपल्या यशाचे श्रेय या खेळाडूंनी मा.खा. डॅा.अशोक नेते, प्रशिक्षक, पालक व कुटुंबीय तसेच मित्र परिवाराला दिले आहे.