लॅायड्सच्या लोहप्रकल्पात आज विस्तारीकरणासाठी जनसुनावणी

कोनसरी येथे एमपीसीबी ऐकणार

गडचिरोली : कोनसरी येथील लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज (दि.23) जनसुनावणी होणार आहे. ही पर्यावरणविषयीची जनसुनावणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोनसरी येथील प्रकल्पस्थळी सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे.

कोनसरी येथील स्टील प्लान्टचे विस्तारीकरण करून तो 2 बाय 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट आणि 2 बाय 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष आयरन ओर पेलेट प्लान्ट, तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लान्ट (4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेतली जाणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या कोनसरी परिसरातील गावांमधील नागरिकांना या जनसुनावणीत सहभागी होता येणार आहे. जवळपास 2 हजार लोक जनसुनावणीला उपस्थित राहतील यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आल्याचे समजते.