शनिवार-रविवारी जिल्ह्यात वादळासह विजांच्या कडकडाटाची शक्यता

हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

गडचिरोली : सूर्य आग ओकत असताना गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात येत्या शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह वादळ सुटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात या दोन दिवसात एक-दोन ठिकाणी वादळी वारा वाहू शकतो. त्या वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतिसात असा असेल. यासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.