गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते शुक्रवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात दाखल झाल्यानंतर मार्कंडा देवस्थान (ता.चामोर्शी) येथे जातील.
दुपारी 12.15 वाजता मार्कंडा देवस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन झाल्यानंतर दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आयोजित बैठकीस उपस्थित राहतील.
सायंकाळी 5 वाजता आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थित राहून सायंकाळी 7 वाजता रामटेककडे प्रयाण करतील.