स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाटून साजरा केला जन्मदिवस

मुलींची पित्याला आदरांजली

गडचिरोली : स्वर्गीय पित्याच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून विवाहित मुली, जावई आणि कुटुंबियांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींना आवश्यक पुस्तके वाटून आपल्या अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. नवेगाव येथील जनजाती विकास समितीद्वारा संचालित वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिकेत हा उपक्रम राबविण्यात आला. (सविस्तर बातमी खाली वाचा)

स्व.दिनकर मु.मार्लीवार यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या परिवाराने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, डॉ. सीमा हेमंत अप्पलवार, डॉ.अद्वय अप्पलवार, वैशाली राजू गुरु, परिमल काळकोंडे, अभिनय पांडे, प्रशांत मंगळगिरी, प्रा.डॉ. प्रीती काळे पाटील आदींसह स्वर्गीय दिनकर मार्लीवार यांच्या मुली, जावई व नातवंड उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि भारतमातेच्या चरणी पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा.दिनकर मार्लीवार यांच्या स्मृतीला उजाळा देऊन मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे संचालन विकास वडेट्टीवार यांनी, तर आभार प्रदर्शन विवेक जोशी यांनी केले. यावेळी स्व.मार्लीवार यांची नात जान्हवी हिने आजोबांच्या जीवनावर आधारित कविता सर्वांसमोर सादर केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.