धान साठवण्यासाठी कढोलीत उभारणार मोठे गोदाम

मा.आ.गजबे यांच्याहस्ते भूमिपूजन

कुरखेडा : तालुक्यातील कढोली येथे आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचा साठा करण्यासाठी भव्य असे गोदामाचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.

आतापर्यंत गोदाम नसल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान उघड्यावर राहात होता. त्यामुळे पावसाच्या दिवसात धान काही प्रमाणात भिजून खराब होण्याची शक्यता राहात होती. गोदामाच्या उभारणीमुळे हे नुकसान टाळता येणार आहे.  या गोदामाच्या बांधकामाकरीता गावातील शेतकरी बांधवांनी प्रयत्न करण्यासोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे याचे श्रेय त्या पदाधिकाऱ्यांना जात असल्याचे यावेळी कृष्णा गजबे म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जीवन नाट, संस्थेचे अध्यक्ष फुकट पाटील गरमळे, उपाध्यक्ष मानकर, पिंटू आखरे, सेवा सहारे, एकनाथ सोनवणे, कालिदास पाटील, काशिनाथ नागनवरे, दिवाकर डोंगरकर, संस्थेचे सचिव रणदिवे, नरेंद्र पटणे, तसेच शेतकरी व गावकरी उपस्थित होते.