अहेरी : मणिपूर राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराविरोधात आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी आलापल्ली येथील वीर बाबूराव शेडमाके चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी सोमय्या यांच्या पोस्टरवर महिला आंदोलकांनी चप्पल व जोडे मारून कठोर कारवाईची मागणी केली. तसेच महिलांवर राजरोसपणे अत्याचार करण्यात येत असल्याने देशात सुरक्षितता राहिली नसल्याचे सांगत सरकारवर टीका करण्यात आली.
यावेळी शिवसेना (ठाकरे) गटाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी मोदींनी ‘मन की बात’पेक्षा ‘जन की हाल’ लक्षात घ्यावी, असे म्हणत टिका केली. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अहेरी उपजिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने, निषेध, आंदोलनाची मालिका राबवून लवकरच मोठ्या स्वरुपात जनाक्रोश मोर्चा काढण्याचा ईशाराही शेख यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.निसार हकीम, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धर्मा रॅाय, अक्षय पुंगाटी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आंदोलनात अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, शिवसेनेचे जिल्हा संघटक विलास ठोंबरे, अहेरी तालुका प्रमुख सुनील वासनिक, शिवसेनेच्या नगरसेविका तथा बांधकाम सभापती नोरास शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, युवा प्रमुख दिलीप सुरपाम, अयान पठाण, महेश मोहुर्ले, राहुल दुर्गे, महिला आघाडीच्या तुळजा तलांडे, एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्गे, महिला आघाडीच्या रमा करपेत, शालिनी नैताम, अरुणा निकोले, मुलचेराचे नीलकमल मंडल, काँग्रेस किसान आघाडीचे नामदेव आत्राम, बबलू सडमेक, रज्जाक पठाण, अज्जू पठाण, हनीफ भाई, राघोबा गौरकार, गणेश उपल्पवार, अजय सडमेक , व्यंकटेश आत्राम आदि पदाधिकारी, शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.