गडचिरोली : सामान्य नागरिकांनी शासकीय कामांबाबतच्या तक्रारी, गाऱ्हाणे तालुकास्तरावर मांडूनी समाधान न झाल्यास त्याबाबत जिल्हास्तरावर तक्रार करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या 3 तारखेला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

दुपारी 3 वाजता हा लोकशाही दिन सुरू होईल. तत्पूर्वी त्याच दिवशी तक्रार अर्ज स्वीकारण्यासाठी दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तालुका पातळीवरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास अशा तक्रारदारांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करावेत. या अर्जात तालुकास्तरावरील अहवालाची प्रत व टोकन क्रमांक जोडणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र 1 अ ते 1 ड) दोन प्रतींमध्ये सादर करावे लागतील.
तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. सामूहिक स्वरूपाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिनाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
































