गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यावर आता भाजपने नवी जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. सदर नियुक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पिपरे यांनी गेल्या 35 वर्षापासून पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटन वाढविण्यासाठी व भाजपचे कार्य व नवनवीन योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले आहे. 2016 मध्ये गडचिरोली नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या राजकीय अनुभवातून नगराध्यक्षांसह 25 पैकी 23 नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळविली होती.
त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याकडे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली.