जिल्हा परिषदेच्या सीईओ आयुषी सिंह यांचे माजी जि.प.अध्यक्षांकडून स्वागत

जिल्ह्यातील समस्यांवर केली चर्चा

गडचिरोली : जिल्हा परिषदेत नव्याने रुजु झालेल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह (भाप्रसे) यांचे आविसं, अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांना यशस्वी लोककल्याणकारी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील विविध समस्यांबाबत सीईओंना माहिती देवून त्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, खमनचेरुच्या सरपंच शायलू मडावी, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य रोहीत गलबले, मिथुन देवगडे, शिवराम पूल्लूरी, अरफज शेख, प्रमोद गोडसेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.