Home दैनंदिन बातम्या आरमोरीत हिंदू समाजातर्फे शोभायात्रा व संमेलन उत्साहात

आरमोरीत हिंदू समाजातर्फे शोभायात्रा व संमेलन उत्साहात

मा.आ.गजबे यांची प्रमुख उपस्थिती

आरमोरी : सशक्त भारताच्या उभारणीसाठी व हिंदू समाजाच्या जागृतीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने तालुका क्रीडा संकुल, हितकारिणी महाविद्यालय येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भजन व कलश यात्रेसह शोभायात्रा आणि त्यानंतर झालेल्या या संमेलनाला अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, नगराध्यक्ष रूपेश पुणेकर, रवी भुसारी, भाग्यवान खोब्रागडे, सदानंद कुथे, डॉ.मसराम, महेश तितीरमारे, अमित मुरंडे, शंकर बोरकर, देवीदास चेटुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत इंजेवारी, शिवणी, सायगांव भजनमंडळाचे संमिश्र भजन व भव्य कलशयात्रा काढण्यात आली. दुपारी 3 वाजता आरमोरी, अरसोडा, रवि, पालोरा, शिवणी, सायगांव, वधाळावासीयांच्या सहभागाने शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

सायंकाळी 4 वाजता मुख्य हिंदू संमेलन सुरू झाले. पं.विनोद बिहारी गोस्वामी महाराज (डोंगरवार, छ.ग.) यांनी मार्गदर्शन केले. शिवशंभु विचारमंच विदर्भ प्रांत संयोजक गजानन शिंदे पाटील यांनी “हिंदू एकतेचे महत्त्व आणि सनातन संस्कृतीची जपणूक” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले, ज्यात त्यांनी हिंदू समाजाला एकजुटीने राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. भारतमातेची आरती सायंकाळी 5.15 नंतर होऊन महाप्रसाद वितरण झाले.

या संमेलनाने सामाजिक एकता व धार्मिक जागृतीला चालना मिळाली. आयोजक सकल हिंदू समाज व स्थानिक मंडळांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.