गडचिरोली : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शनिवारी (दि.11) महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्रांतिकारी विचारातून ज्यांनी महिलांच्या शिक्षणाकरिता मुलींची पहिली शाळा सुरु करून त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांचे उपकार भारतातील तमाम महिलावर्ग विसरू शकत नाही, अशी भावना यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषदेचे सभापती लिलाधर भरडकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुषमा येवले, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सिंगाडे, रामदास मंगरे, बळवंत येवले, नगरसेविका प्रतिभा कुमरे, माधुरी मंगरे, अंजुम सय्यद, तसेच किरण मंगरे, नेहा सय्यद, गिरीश खाडीलकर, लंकेश सेलोटे, अंकुश झरली, मिलिंद मडावी, सुजल सोरते व पदाधिकारी उपस्थित होते.
































