Home राजकीय घडामोडी रिपब्लिकन पार्टीचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात

रिपब्लिकन पार्टीचा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात

केवळ मंत्री नाही, तर व्यवस्था बदला

गडचिरोली : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची गडचिरोली शाखा आणि बामसेफच्या संयुक्त विद्यमाने दि.26 रोजी शासकिय विश्रामगृह गडचिरोली येथे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षस्थतेखाली तालुकास्तरीय मेळावा उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, मारोती भैसारे, लवंकुश भैसारे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम रामटेके, मिलिंद अंबादे, प्रमोद देवतळे, एटापल्ली महिला आघाडीच्या प्रमुख संघमित्रा राजवाडे, निशा बोदेले, विशाखा देवतळे, मनोहर चलाख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी नीट परिक्षा प्रकरणानंतर बळी गेलेल्या विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तमाम रिपाइंच्या कार्यकत्यांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बोरकर यांनी केले. भोजराज कान्हेकर म्हणाले की, एक मंत्री बदलवून होणार नाही तर संपुर्ण व्यवस्था बदलण्यासाठी पंतप्रधानांचा सुद्धा राजीनामा घेण्याची गरज आहे.

या बैठकीला मदन उराडे, मोरेश्वर निमगडे, नुर्फनाथ भैसारे, व्ही.के. बाबनवाडे, नेताजी मेश्राम, रोशन उके, जीवन मेश्राम, किशोर मेश्राम, नरेंद्र शेंडे, योगराज रामटेके, नामदेव दुधे, माधव वैघ, धनराज पाझारे, जयराम उंदिरवाडे, दामोधर शेन्डे, राजु वनकर, अशोक अंबादे, कुरखेडाचे भीमराव गोंडाणे, नाजुक भैसारे, चेतन हेडावू, पाकी भैसारे, लता रामटेके, प्रेमलता कान्हेकर, वासुदा शेख, दुशिला रामटेके, ज्योती मेश्राम, लिला वाकडे, देवला शेन्डे, दर्शना वणीकर, अहिला सहारे, शशीकला सहारे, अरुणा उंदिरवाडे, निता उंदिरवाडे आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद राऊत, तर आभार अरविंद गजभिये यांनी मानले.