माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते गोलाकर्जीतील अंगणवाडीचे उद्घाटन

अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोलाकर्जी येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते. सदर बांधकाम पूर्णत्वास गेल्यानंतर अंगणवाडीचे उद्घाटन आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन इमारतीमुळे बालकांना बसण्याची चांगली सोय झाली आहे.

या कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, खांदला ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश सिडाम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य अरुणा सड़मेक, खांदलाच्या माजी सरपंच लक्ष्मी श्रीरामवार, राजारामचे माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आत्राम, पाटील बिचू मडावी, पाटील मुत्ता पोरतेट, अँड.एच.के.आकदर, श्रीनिवास राऊत, वसंत सड़मेक, दीपक अर्का, सुरेश सोयाम, नारायण चालुरकर, नामदेव पेंदाम, संतोष श्रीरामवार, चंद्र आत्राम, सचिव कु.एस.सड़मेक, अंगणवाडी सेविका संगीता आत्राम, कर्मचारी व्यंकटेश अलोने, नरेंद्र गरगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते.