गडचिरोली : आर्य वैश्य (कोमटी) समाज गडचिरोली यांच्या वतीने समाजबांधवांच्या कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन दि.29 रविवारला करण्यात आले होते. यावेळी महिलांवर्गाने सादर केलेल्या भुलाबाईच्या गाण्यांनी अनेक महिलांना भूतकाळात नेले होते. कन्यका मातेची आरती केल्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.
सर्व स्पर्धेतील विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आले. सोबतच या कार्यक्रमामध्ये बतकमा आणि भजन स्पर्धेत विजयी समुहाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमांची सांगता सामूहिक दांडिया आणि दूध घेऊन करण्यात आली.
गेल्यावर्षीच्या कार्यक्रमाच्या अहवालाचे वाचन वासवी युथ क्लबचे अध्यक्ष अभय सुरेश बुर्लावार यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन श्वेता अंकुश गोंड्रालवार व भाग्यश्री पुनेश गुंशेट्टीवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी वासवी युथ क्लबचे सचिव समीर कटकमवार, उपाध्यक्ष सचिन गण्यारपवार, कोषाध्यक्ष संदेश तम्मेवार, सहसचिव नितीन बट्टूवार, तसेच सतीश तुंडूलवार, प्रवीण बुक्कावार, निलेश गुंडावार, आतिष अलगमवार, गणेश कोंकमवार, स्वप्निल यामावार, नकुल कुकडपवार, विशाल दोंतुलवार आणि प्रमोद चिलमलवार आदींनी परिश्रम घेतले.
विविध स्पर्धा आणि त्यातील विजेते असे आहेत
लहान मुलांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी ग्रिटींग कार्ड बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात राशी राकेश यामावार आणि श्रेया महेश बुद्धावार यांनी उत्कृष्ट ग्रिटींग बनवून बक्षिस मिळविले.
यावेळी ज्येष्ठ महिलांनी अप्रतिम पारंपरिक कला सादर केल्या. त्यात लक्ष्मी आनंद बुद्धावार आणि नंदा दीपक माधमशेट्टीवार अव्वल ठरल्या. यावेळी जोडप्यांचा खेळही चांगलाच रंगला. त्यात अरुणा संतोष पद्मावार, चेतना अविनाश बट्टूवार आणि सुनिता अरुण पालारपवार यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावला.
मुलांसाठी पीकअप द बॅाटल गेम घेण्यात आला. त्यात वेदांत सचिन कोडमलवार आणि सिद्धेश गणेश कोंकमवार यांनी क्रमांक पटकावला. भुलाबाई सजावट स्पर्धेत श्वेता राकेश यामावार आणि अपूर्वा सचिन नुटीकटलावार यांनी क्रमांक पटकावला.
यावेळी दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. त्यात ईशा सतीश तुंडूरवार (दहावी), कार्तिक प्रदीप कोडमेलवार (बारावी) आणि ओम देवानंद गण्यारपवार (बारावी) यांना गौरविण्यात आले. शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या समाजबांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात प्रशांत तम्मेवार, नितीन चिंतावार, डॉ.मनिषा कोषटवार यांचा समावेश होता.