सीआरपीएफच्या जवानांकडून गडचिरोलीत ‘फिट इंडिया फ्रिडम रन’चे आयोजन

स्वच्छ भारत, श्रेष्ठ भारतचा दिला संदेश

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनच्या वतीने दि.30 ला “फिट इंडिया फ्रिडम रन 4.0” चे आयोजन केले होते. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आणि त्याचे महत्व सांगणारा संदेश या रन मधून देण्यात आला.

यात सीआरपीएफचे अधिकारियो, कर्मचारी सहभागी झाले होते. 192 बटालियनचे मुख्यालय ते सीआरपीएफ कॅम्प एमआयडीसी मधील पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत झालेल्या या फिट इंडिया रन ला द्वितीय कमांड अधिकारी प्रभात गौतम, उपकमांडंट शिव महेन्द्र सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

गडचिरोलीकर नागरिकांमध्ये या फिट इंडिया फ्रिडन रन बद्दल उत्सुकता असल्याचे दिसून आले.