गडचिरोली : जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रावर कधी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तर कधी आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व राहिले आहे. लोकप्रतिनिधींचे चेहरे बदलले. राजकीय पक्षांचे अस्तित्वही कमी जात होत असते. परंतू गेल्या अनेक वर्षात गडचिरोली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर पोरेड्डीवार सावकारांच्या गटाचे वर्चस्व कायम आहे. यावेळी आरमोरी, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासोबत सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीतही आपल्या गटाचे ७ संचालक निवडून आणून सावकार बंधूद्वयांनी सहकार क्षेत्राचे सम्राट आपणच असल्याचे सिद्ध केले.












