गडचिरोली : तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर पकडला आहे. खासदार अशोक नेते यांना निर्मल जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांची जबाबदारी असल्याने ते अनेक ठिकाणी बैठका घेऊन प्रचाराबाबत मार्गदर्शन करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत आहेत. अशा व्यस्ततेतही त्यांनी मुधोल विधानसभा क्षेत्रातील भैसा गावाला भेट देऊन मातीचे दिवे आणि विविध वस्तू बनविणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी खा.नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘लोकल फॉर वोकल’ या उपक्रमांतर्गत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मातीपासून भांडी व दिवाळीला प्रकाशमान करणारे दिवे बनवणारे व्यवसायिक नरेश कोटागिरी यांच्याशी व त्यांच्या परिसरातील नागरिकांसोबत शासकीय योजनांबद्दल चर्चा केली. त्यांच्या वस्तूंची पाहणी करून कलात्मक गुणांची तारीफ केली. केंद्र सरकारच्या जन-धन योजनेअंतर्गत त्यांचे बँक खाते खोलले गेले होते. त्यामुळे खा.नेते यांनी त्यांच्या काही वस्तू खरेदी करून त्याचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केले.
आपण दिवाळी साजरी करत असताना भारताला आत्मनिर्भर करा, आपली दिवाळी प्रकाशमान बनवा असे आवाहन करून तेथील व्यावसायिकांसोबत, त्यांच्याकडून खरेदी केलेल्या वस्तूंसोबत सेल्फीही काढला.