अहेरी : तालुक्यातील बोरी येथील भोई समाज बांधवांसाठी सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम होणार आहे. शुक्रवारी (दि.12) माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
बोरी येथे मोठ्या प्रमाणात भोई समाजबांधव वास्तव्याने आहेत. समाजाचा कुठलही कार्यक्रम घेण्यासाठी सभामंडप नसल्याने अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील लोकांनी सभामंडपाची मागणी केली होती. भोई बांधवांची अडचण लक्षात घेऊन माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेऊन ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत 7 लाख 50 हजार रुपयांचा निधी त्या कामासाठी मंजूर करण्यात आला. त्यातून सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम केले जाणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी राकाँचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, महेश बाकीवार, साईनाथ अलवलवार, नागेश पुल्लीवार, अशोक वासेकर, विजय कोकीरवार, गव्वा कपेलवार, शंकर सुर्लावार, पोचम बाकीवार, संजय येल्लेलावार, भिमराव कपेलावार, सुरेश बाकीवार, राजन्ना सगांर्तीवार, रामन्ना गन्लावार, सिनू कपेलावार, संजय येल्लावार, पोचम मंचर्लावार, मल्ला कपेलावार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.