आंब्यांच्या सुधारित आणि स्थानिक प्रजाती पहायच्या? मग चला कृषी विज्ञान केंद्रात

गडचिरोलीत आज आंबा महोत्सवाचे आयोजन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आंब्यांच्या विविध सुधारित आणि स्थानिक प्रजातींची माहिती देण्यासोबत आंब्यांचे महत्व, लागवडीचे तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दि.22 रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता या आंबा महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर मार्गावरील कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे.

या महोत्सवात आंब्याच्या विविध प्रजातींची कलमे आणि फळे विक्रीकरिता उपलब्ध राहणार आहेत. त्याचबरोबर आंब्याचे आहारातील महत्व, आंबा पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, आंब्याची अभिवृद्धी, आंब्याचे मूल्यवर्धन आणि प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी या आंबा महोत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शास्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांनी केले आहे.