गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या गडचिरोली-चिमूर याा लोकसभा मतदार संघाची बहुप्रतीक्षित मतमोजणी उद्या दि.4 जून रोजी गडचिरोलीत होणार आहे. चंद्रपूर मार्गावरच्या शासकीय कृषी महाविद्यालयात होणार असलेल्या या मतमोजणीनिमित्त लोकसभेच्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची मोठी गर्दी निकाल ऐकण्यासाठी होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
याशिवाय मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवार आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय जिल्हा परिषदेच्या मैदानात करण्यात आली आहे. तेथून सर्वांना पायीच मतमोजणीच्या ठिकाणी यावे लागणार आहे.
मतमोजणीदरम्यान सदर महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सदर महामार्गावरील वाहतूक दि.4 जूनच्या पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी सदर मार्ग बंद राहणार आहे.
पर्यायी वाहतूक मार्गाची व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.
1) जड वाहनांसाठी इंदिरा गांधी चौक ते चामोर्शी रोड – सेमाना देवस्थान – आंनदानगर कॉलनी– कोर्ट चौक – चंद्रपूर मार्ग आणि तेथून इच्छित स्थळी जाता येईल.
2) हलक्या वाहनांसाठी आयटीआय चौक – एलआयसी चौक – सीईओ बंगला चौक- शासकिय विश्रामभवन (सर्किट हाऊस)– जिल्हा सामान्य रुग्णालयमार्गे चंद्रपूर मार्ग आणि तेथून इच्छित स्थळी जाता येईल.