गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम एकाच दिवशी अहेरी तालुक्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
ना.धर्मरावबाबा आत्राम दि.22 ला सकाळी 9.30 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून सकाळी 10.30 वाजता पेरमिली येथे पोहोचून 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता महसुल भवन, पेरमिली येथे अहेरी तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता अहेरी येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. रविवार, दि.23 जून रोजी सकाळी 11 वाजता कारसपल्ली 33 के.व्ही विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहून दुपारी 1 वाजता कारसपल्ली येथून सिरोंचामार्गे हैदराबादकडे रवाना होतील.
अहेरीत आज खा.किरसान यांचा सत्कार
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार शनिवार दि.22 रोजी सकाळी गडचिरोली येथून अहेरीसाठी रवाना होऊन सकाळी 10.30 वाजता अहेरीच्या शासकीय विश्रामगृहात पोहोचतील. 11 वाजता अहेरी तहसील कार्यालात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. दुपारी 1 ते 2 दरम्यान माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवासस्थानी त्यांचा वेळ राखीव राहणार असून त्यानंतर खा.डॅा.नामदेव किरसान यांच्या सत्कार समारंभाला इंडियन पॅलेसमध्ये ते उपस्थित राहतील. तेथून ब्रह्मपुरीसाठी रवाना होतील.